वडियेरायबाग ता. कडेगांव येथील प्रतिबंधात्मक लोखंडी कमानीची मोडतोड - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Sunday, December 12, 2021

वडियेरायबाग ता. कडेगांव येथील प्रतिबंधात्मक लोखंडी कमानीची मोडतोड

☝ वाळूचोरांनी सदर प्रतिबंधात्मक लोखंडी कमानीची मोडतोड केली असल्याचे नागरिक सांगत आहेत.☝

      कडेगाव तालुक्यातील वडियेरायबाग मध्ये नदी पुलावरील अवजड वाहने जाऊ नये म्हणून केलेल्या प्रतिबंधात्मक लोखंडी कमानीची मोडतोड करण्यात आली आहे. स्व.पतंगराव कदम यांच्या विशेष प्रयत्नांतून मोठा निधी खर्च करून येवलेवाडी वडीयेरायबाग या दरम्यानच्या येरळा नदीवरील बंधाऱ्याचे काम करण्यात आले होते मात्र काही दिवसापूर्वी येऊन गेलेल्या महापुरांमध्ये ह्या बंधाऱ्याची मोडतोड झाली होती त्यानंतर ह्या बंधाऱ्यावरील पूल     वाहतुकीसाठी पुन्हा पूर्ववत करण्यात आला. 
☝हीच ती प्रतिबंधात्मक लोखंडी कमान☝
पण बंधाऱ्यावरून अवजड वाहने जाऊ नये यासाठी असलेल्या प्रतिबंधात्मक RCC कमानीचे काम मात्र झाले न्हवते. दरम्यान काल दिनांक 12/12/2021 रोजी ग्रामपंचायत वडियेरायबाग मार्फत ह्या बंधाऱ्यावरील पुलाच्या सुरक्षिततेसाठी पुन्हा लोखंडी कमान बसवण्यात आली होती. पण एका रात्रीतच ह्या कमानीची मोडतोड करण्यात आली आहे. ह्या पुलावरून अवैध्य वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात होतेय. आणि सदरची कमान वाळू तस्करांनीच मोडली असल्याची शंका व्यक्त होत आहे. तर सदरची कमान मोडून नदीमध्ये टाकन्यात आली आहे. कडेगाव तालुक्यात अवैध्य वाळू तस्करी वाढत असून प्रशासनाचे यावर जाणीवपूर्वक यावर दुर्लक्ष आहे हे स्पष्ट होऊ लागले आहे. सदरची प्रतिबंधात्मक कमान JCB च्या साह्याने मोडली असावी असे प्रथमदर्शनी दिसून येत आहे मात्र ह्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि संबंधित विभागामार्फत यावर पूर्वीसारखी RCC कमान करण्यात यावी अशी मागणी वडियेरायबागच्या ग्रामस्थांनी केली आहे.

📢[Ad] हे ही वाचा : 👇तडीपार तरुणाचा कडेगाव तालुक्यातील कोरोनाग्रस्तांना आधार...👇वाचण्यासाठी खालील image वर क्लिक करा.



No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785