आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ कडेगांव तालुक्यातील गोपीचंद पडळकर समर्थक कार्यकर्त्यानी गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस कडेगांव येथील मुख्य चौकात दुग्धाभिषेक घातला. यावेळी गोपीचंद पडळकर तुम आगे बडो, हम तुम्हारे साथ है | अश्या घोषणांनी परिसर दणाणून निघाला. गोपीचंद पडळकर समर्थकांनी I Support Gopichand Padalkar या नावाचे बॅनर हातात घेऊन गोपीचंद पडळकर यांचे समर्थन केले.
गोपीचंद पडळकर समर्थकांनी कडेगांव येथे निवेदन दिले. |
संस्थांचे कार्य अहवाल |
कडेगांव येथे गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक घालण्यात आला. |
सर्वसामान्य कुटुंबातून येऊन गोपीचंद पडळकर आमदार झालेने प्रस्थापित लोकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे असे शिवशक्तीचे अध्यक्ष प्रमोद मांडवे म्हणाले. श्री. मांडवे पुढे म्हणाले, जातीयवाद पेरून स्वतः सत्ता भोगायची पद्धत गोपीचंद पडळकर यांनी लोकांच्यात स्वाभिमान निर्माण करून बंद केल्यामुळे प्रस्थापितांचे दुकान बंद झाले आहे. म्हणून बहुजन-मराठा-धनगर असा वाद पेटवून स्वतःची पोळी भाजायचा डाव प्रस्थापित मंडळिणी आखला आहे. परंतु आता समाज साक्षर झाला आहे. सर्व बहुजन समाज शेवटच्या श्वासापर्यंत गोपीचंद पडळकर यांच्या सोबत आहे.
यावेळी विक्रम गोरड, श्रीकांत महाडीक, रोहित मांडवे, अतिष रास्कर, गणेश मांडवे, उमाजि जाधव, वैभव हनमर, राहुल रास्कर, तेजस रास्कर, गणेश रास्कर, संपतराव मोरे व गोपीचंद पडळकर समर्थक उपस्थित होते.
धनगर समजा विषयी जातिवाचक पोस्ट टाकनाऱ्यावर गुन्हा दाखल करा अन्यथा आंदोलन : विकास माने
तहसील कार्यालय कडेगांव येथे धनगर समाज व गोपीचंद पडळकर समर्थक यांचेवतीने निवेदन देनेत आले |
धनगर समजावीषयी सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या लोकावर गुन्हा दाखल करावा. अन्यथा राज्यभर धनगर समाजाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असे सकल धनगर समाज आरक्षण संयोजन समिति कडेगांव तालुका अध्यक्ष विकास माने यांनी इशारा दिला. यावेळी ते म्हणाले जितेंद्र आव्हाड यांनी राजे मल्हारराव होळकर यांच्याविषयी तसेच धनगर समजविषयी अपशब्द काढले. त्यांच्यावर कारवाई करावी आणि सोशल मिडियावर धनगर समाजविषयी जातिवाचक बोलणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा. अन्यथा आंदोलन करू.
No comments:
Post a Comment