कायदा संगळ्यासाठी समान असतो हे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या कारवाईने सिद्ध झाले.... - A2Z News.Live -->

Breaking

Post Top Ad

SuperBrain Call 9673371785

Post Top Ad

For More Details Call On 9673371785

Search Your Story

Wednesday, May 27, 2020

कायदा संगळ्यासाठी समान असतो हे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या कारवाईने सिद्ध झाले....

सांगलीचे पोलिस अधीक्षक श्री. सुहेल शर्मा 
आपला तो बाबू आणि दुसऱ्याच ते कारट ही मराठीतील म्हण अनेक वेळा पोलिस प्रशासनाबद्दल वापरली जाते. पोलिस आपल्या कर्मचाऱ्यावर काहीच कारवाई करत नाहीत. त्यांना पाठबळ देतात. अश्या अनेक तक्रारी येतात. वास्तविक अनिकेत कोथळे प्रकरणातसुद्धा असाच आरोप झाला. परंतु सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी अचानक पदाचा बेकायदा वापर करून मजुरांना धमकाऊन लुटणाऱ्या कडेगांव पोलिस स्टेशन मधील पोलिस कर्मचारी संतोष पाटील याला निलंबित करून कायदा संगळ्यासाठी समान आहे हे पुनः एकदा सिद्ध केले आहे. असे वरिष्ठ अधिकारी कडक कारवाई करू लागले तर सामान्य माणसाना प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याची गरजच पडणार नाही. त्यामुळे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या या कारवाईमुळे सामान्य नागरिकांत विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

निलंबित पोलिस कर्मचारी संतोष पाटील

कडेगांव एम आय डी सी येथील जिल्हा सीमेवर कडेगांव पोलिस ठाणे येथील पोलिस हवालदार संतोष पाटील गोरगरीब आणि परप्रांतीय लोकांना विनाकारण मारहाण करून मजुरांना लुटत होता. त्याच्यावर निलंबणाची कारवाई करून कायदा सगळ्यांसाठी समान आहे हे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या या कारवाईमुळे पुनः एकदा सिद्ध झाले आहे. वास्तविक सदर संतोष पाटील यांच्यावर अनेक वेळा पोलिस दरबारी अनेक लेखी आणि तोंडी तक्रारी आल्या आहेत. परंतु त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नव्हती . किंबहुना वरिष्ठ सुद्धा कारवाई करण्यास धजावत नव्हते. त्यामुळे लोकांचा पोलिस प्रशासनावरचा विश्वास कमी होत चालला होता. अनेक तक्रारी होऊनसुद्धा कारवाई होत नसल्यामुळे संतोष पाटील हा माझे कोणीच काही करू शकत नाही या अहमभावतून सामान्य लोकांना त्रास देत होता. त्याच्या अश्या हुकुमशाही आणि अहंकारी वागण्यामुळे कडेगांव तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले होते. लॉकडाउन मध्ये अनेक धंदे, पानपट्टी उद्योग बंद झाल्यामुळे अतिरिक्त कमाईसाठी परप्रांतीय मजुरांना त्याने टार्गेट केले होते. त्यांना धमकाऊंन मारहाण करून तो त्यांच्याकडून पैसे उकळत होता असे नागरिकांनी सांगितले. याआधी बेकायदा अटक करून त्रास दिलेबद्दल कडेगांव न्यायालयाने त्याची खरडपट्टी केली होती. पण त्यानंतर न्यायालयालासुद्धा न जुमानता त्याचे बेकायदेशीर खेळ सुरूच होते. पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे कायदा संगळ्यासाठी समान असतो हे पुनः एकदा सिद्ध झाले आहे. 

 संतोष पाटील याच्या संपत्तीची चौकशी व्हावी : 
    संतोष पाटील याने पदाचा दुरुपयोग करून अनेक सर्वसामान्य नागरिकांना त्रास दिला आहे अश्या नागरिकांनी संतोष पाटील याच्या संपत्तीची तसेच त्याच्यावर आलेल्या सगळ्या तक्रारींची चौकशी करावी अशी मागणी केली आहे. संतोष पाटील याने अनेकदा विनाकारण आमच्याकडून पैसे उकळले आहेत. आणि आम्ही त्याच्यावर अनेक वेळा तक्रार केली आहे. परंतु कारवाई झाली नाही आता त्याच्या सगळ्या संपत्तीची आणि तक्रारींची चौकशी करावी अशी मागणी  नाव न घेण्याच्या अटीवर अन्यायग्रस्त लोकानी केली आहे.  

सोशल मिडियावीर नेटीजन्स संतोष पाटील याच्यावरच्या कारवाईने सुखावले 
    कडेगांव पोलिस ठाणे येथील पोलिस कर्मचारी संतोष पाटील याच्यावर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी निलंबनाची कारवाई केल्यामुळे सोशल मिडियावर एकच चर्चा रंगली आहे. ती पोलिस कर्मचारी संतोष पाटील यांच्या निलंबनाची. अश्या बेधडक कारवाई मुळे नेटीजन्स पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांचे आभार मानत आहेत. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

For More Details Call On 9673371785